मानवी नातं ही फार अनमोल गोष्ट आहे.ते जेवढं सहज आहे तेवढंच गूढ आहे.अगम्य आहे,अकल्पनिय आहे.अनेक घरात आईवडिलांवर प्रेम करणारी मुलं असतात,परंतु आई वडिलांच्या कृतींचे अनुकरण करणे त्यांना अनावश्यक वाटते.जबाबदारी न घेणे ,निसर्गनियमाच्या बरोबर विरुद्ध वागणे हेच जास्त प्रिय असते.प्रेम आहे पण आमच्या मनाविरुद्ध काही ऐकणार नाही याला प्रेम कसे म्हणावे ? ती माझ्या मते फसवणूक आहे. प्रेमाचे ढोंग आहे,नाटक आहे, कारण खऱ्या प्रेमाला दुसऱ्याच्या अंतरात्म्याची तळमळ कळल्याशिवाय राहूच शकत नाही.