नदी..

कोणाच्या भाग्यरेषा कोणाला कुठे घेऊन जातील ते स्वतः कोणीच ठरवू शकत नाही.अगदी निसर्ग सुद्धा.आणि याच सगळ्यात भारी उदाहरण म्हणलं तर नदी.तिचा उगमच संघर्ष करत होतो आणि संघर्ष करतच स्वतःचा मार्ग तयार करते.

तीच स्वतःच अस अस्तित्व म्हणलं तर काहीच नाही.पण तिच्याशिवाय कोणाचं अस्तित्व अस काहीच नाही.भारतीय संस्कृतीमध्ये पण ती पूजनीय आहे ती यामुळेच..तिच्या स्वत्वा चा विचार केला तर ती शांत,अविरल,समृद्ध,निश्चल..पण याच स्वत्वाला धक्का लागला तर ती रौद्र,भयंकर,अनिश्चल.

नदी ने समुद्रात गेलच पाहिजे,त्यातच तिची परिपूर्ती.तस नाही झालं तर चक्र च थांबेल.पण अशाही काही नद्या आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.पण म्हणून का त्याचं महत्व कमी होत नाही ,म्हणून का त्यांचा धर्म बदलत नाही.नदी समुद्राला मिळते ते तिचे समर्पण असते,स्वतःहून केलेले.त्यात तिचे मी पण कुठेच नसते.

नदी काय स्त्री काय दोघींचे जीवन एकचं!

सर्वांच्या उपयोगी पडायचे..संसार फुलवायचा..समर्पण करायचे..ते हि मूकपणे!!