चुका स्वीकारायला खूप मोठं आणि निर्भीड मन लागत.ते प्रत्येकाकडे असतेच अस नाही.आणि काही जण तर जाणूनबुजून प्रधावनाने चुका करत फिरतात.त्यांना हे पण समजण्याइतपत ज्ञान नसत कि त्यांची चूक एखाद्याच आयुष्यं उध्वस्त करू शकते.

आणि जाणूनबुजून चूक करणारा त्याने केलेली चूक मान्य तर करतच नाही,याउलट तोच खरा कसा याबद्दल तो आग्रही असतो.आणि पुढच्या माणसाला त्याची चूक माहित असली तरी खरं बोलायचं सोडून आततायी पणे पुढच्यालाच खोटं ठरवतो.

अशी चूक क्षम्य नसतेच मुळी.

अनावधानाने झालेली चूक क्षम्य असते कारण ती चूक करणाऱ्या मध्ये त्याच्या वागण्यातून अपराध भावना दिसून येते.

प्रधावनाने केलेली चूक गुन्हा ठरते.कारण माणूस ती चूक कधीच स्वीकारत नाही.सराईत गुन्हेगारासारखा पुन्हा पुन्हा त्याच चुका तो माणूस करतो…